🌟सनातन संघाच्या अध्यक्षांसह काही पत्रकारांच्या हत्येच्या कटात नांदेड जिल्ह्यातील नरसीतील युवकाचा हात ?


🌟नरसीतील २० वर्षीय शेख शकीलला गुजरात राज्यातील सुरत पोलिसांनी घेतले ताब्यात🌟 

नांदेड (दि.१३ मे २०२४) - सनातन संघाच्या अध्यक्षांसह काही पत्रकारांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून गुजरात राज्यातील सुरत जिल्हा पोलिस दलाच्या गुन्हे पथकाने दि.१२ मे २०२४ रोजी पहाट उजाडण्यापुर्वीच नांदेड जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधून जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील नरसीतून २० वर्षीय युवक शेख शकील यास ताब्यात घेण्याची कारवाई केली संशयीत युवक शेख शकील याच्यावर सनातन संघाचे अध्यक्ष आणि काही पत्रकारांचा खून करण्याचा कट केला असा आरोप आहे सुरत पोलीसांनी शेख शकील यास अटक करून सुरतच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते दरम्यान या घटनेमुळे नरसी गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की सुरत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरत जिल्हा पोलीस दलाने मिळवलेल्या सखोल माहितीनुसार शेजारील देश पाकिस्तानात राहणाऱ्या वकास व सरफराज डोगर या दोघांनी 'जैशबाबा राजपूत' नावाचा व्हाटसऍप ग्रुप चालवत होते. या व्हाटसऍप ग्रुपमध्ये सुरत येथील साहेल टिमोल याच्यासह बिहार राज्यातील शहनाज हे देखील सहभागी होते. सुरत पोलीस दलाच्या हाती लागलेल्या व्हाटसऍप चॅटींगनुसार सनातन संघाचे अध्यक्ष आणि काही पत्रकारांना मारण्यासाठी या 'जैशबाबा राजपूत' ग्रुपमध्ये चर्चा चालायची त्यात नांदेड जिल्ह्यातील नरसी गावचा शेख शकील शेख सत्तार हा देखील सहभागी होता या व्हाटसऍप ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सुरत पोलीस दलाने हस्तगत केली.सुरत पोलीस आयुक्तालयात या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम १५४ (अ),४६८,४६७,४७१,१२० (ब) सह कलम ६६ (ड),६७,६६(अ) तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा क्रमांक ०३९/२०२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता

त्यानंतर सुरत शहर गुन्हा शाखा येथील अधिकारी व पोलीस अंमलदार नांदेडला आले आणि त्यांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराची माहिती श्रीकृष्ण कोकाटे यांनी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना दिली. त्यानंतर सुरत पोलीसांसोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बिरादार, मस्के आदींना पाठविले. रविवारची पहाट होण्याअगोदरच नरसी गावात सुरत आणि नांदेड पोलीस पथकाने संयुक्त मोहिमेत शेख शकील शेख सत्तार या युवकाला ताब्यात घेतले आणि रविवारी दुपारनंतर सुरत पोलीस शेख शकीलला घेवून पुन्हा परतीच्या प्रवासावर निघालेले आहेत...…

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या