🌟महाड येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना घेण्यास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश....!


🌟सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश : सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुरक्षित🌟 

महाड येथून बारामती येथे आयोजित महिला मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि.०३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०९-३० वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टरचा पायलट दोघेही सुरक्षित आहेत हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे मुळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही महाड येथे सदरील घटना घडल्याची माहिती समोर आली आहे सुषमा अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

हेलिकॉप्टच्या झालेल्या या भयंकर अपघातात हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले असून हेलिकॉप्टरचा पायलट अगदी सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या