🌟हैदराबाद-छत्रपती संभाजी नगर एक्स्प्रेसने अनोळखी इसम गंभीर जखमी....!


🌟जखमी इसमास तातडीने उपचार कामी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले🌟 

छत्रपती संभाजी नगर  (दि.१४ मे २०२४) - हैद्राबाद-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस रेल्वेने आज मंगळवार दि.१४ मे रोजी एक अनोळखी इसम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली सदरील जखमी इसमास छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आणून त्यास तातडीने उपचार कामी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

सदरील जखमी अनोळखी इसमाची ओळख पटविण्यात यश मिळत नसल्याने त्याला किंवा नातेवाईकांना कोणी ओळखत असल्यास किंवा त्याच्या विषयी माहिती असल्यास रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना 9158888159 या मोबाईल क्रमांकावर किंवा रेल्वे पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर यांना संपर्क साधावा असे आवाहन प्रवासी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या