🌟भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्‍या आ.आव्हाडां विरुध्द कारवाई करा.....!


🌟अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नागसेन पुंडगे यांनी केली🌟 

परभणी (दि.30 मे 2024) : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्‍या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नागसेन पुंडगे यांनी केली आहे.

              मुख्यमंत्र्यांना परभणी जिल्हा प्रशासनामार्फत पाठविलेल्या निवेदनात पुंडगे यांनी आव्हाड यांच्या स्टंटबाजीच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून आव्हाड हे सातत्याने संत-महात्म्यांविरोधात अवमानास्पद वक्त्व्य करीत आहेत. सामान्य माणसाच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आव्हाड यांच्या या समाजविघातक कृत्यांवर आळा बसविण्याकरीता कठोर भूमिका घेतल्याशिवाय मार्ग नाही, असे मत पुंडगे यांनी व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या