🌟परभणी तालुक्यातील मिरखेल येथे खरीप हंगाम पूर्व तयारी बैठक संपन्न....!


🌟यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषी माहिती व तंत्रज्ञान अधिकारी डॉ.गजानन गडदेंची प्रमुख उपस्थिती🌟 


परभणी :- परभणी तालुक्यातील मिरखेल येथे दि.२४ मे २०२४ रोजी अनिल गवळी जिल्हा कृषी अधिक्षक परभणी,उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे,तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाने कृषी सहाय्यक वंदना देशमुख यांनी खरीप हंगाम पूर्व तयारी बाबतीत बैठकीचे नियोजन केले.

सदरील बैठकीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषी माहिती व तंत्रज्ञान अधिकारी डॉक्टर गजानन गडदे हे प्रमुख अतिथी होते. सदरील बैठकीत त्यांनी सोयाबीन ,कापूस, तूर या पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी,सोयाबीन व तुर पिकाची बीज प्रक्रिया कशाप्रकारे घ्यायची आहे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.मंडळ कृषी अधिकारी पिंगळी श्रीमती शीतल पौळ यांनी PMFME, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मागेल त्याला शेततळे याबाबत मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमास गावातील सरपंच उपसरपंच कृषी पर्यवेक्षक रजनीकांत देशमुख सर, कृषी सहाय्यक नरवाडे, प्रगतिशील शेतकरी जनार्दन आवरगंड धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. सदरील बैठकीचे नियोजन प्रगतिशील शेतकरी प्रद्युम्न देशमुख यांनी केले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या