🌟संशयीत क्षयरुग्णांची क्ष-किरण तपासणी शिबीर उत्साहात संपन्न....!


🌟वाशिम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग ठोंबरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- नर्मदा सॉलवेक्स प्रा.लि.व काळूराम फूड प्रॉडक्ट्स प्रा.लि वाशिम येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ.सतिश परभणकर, डॉ.अनिल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयीत क्षयरुग्णांची फिरते क्ष- किरण वाहनाद्वारे एक्स रे तपासणी शिबीर घेण्यात आले. 

यावेळी वैभव रोडे यांनी १६२ संशयीत क्षयरुग्णांची क्ष किरण तपासणी केली. तसेच संचालक नर्मदा सॉलवेक्स संजय रुहाटीया यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ रूहाटीया, शहाजी सोनूने, नितेश एकगरे, रवींद्र शर्मा, राजूरवार, अनिल सोमाणी यांच्या सहकार्याने तपासणी करण्यात आली. समुपदेशक पंढरी देवळे यांनी १८० व्यक्तींची एड्स तपासणी केली. परिचर आजिनाथ पालोदे ,वाहनचालक गणेश राऊत, कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी ८७ संशयीतांचे स्पुटम गोळा करण्यात आले. उपस्थितांना क्षयरोग, डेंग्यू , एड्स,ऍडल्ट बिसीजी लसीकरण बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.शिबीराचे नियोजन आरोग्य निरीक्षक रामदास गवई जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या