🌟परभणीत महसुल विभागातील नवनियुक्त तलाठी यांचेकरिता प्रशिक्षणाचे आयोजन....!


🌟या प्रशिक्षणाच्या वर्गाचे आज दि.14 मे रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते झाले उद्घाटन🌟


परभणी (दि.14 मे 2024) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी पदभरती-2023 च्या नवनियुक्त तलाठी तसेच अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या नवनियुक्त तलाठी यांचेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिनांक 13 ते 22 मे 2024 या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या वर्गाचे आज दि.14 मे रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते उद्घाटन झाले. 


प्रशिक्षणा दरम्यान नवनियुक्त तलाठी यांचेकरिता 7/12 संगणीकरण, ई-गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन आराखडा, नैसर्गित आपत्ती व महसूल विषयक इत्यादी विषयांवर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले. सन 2023 मध्ये सरळसेवा पदभरतीतील व अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तलाठी म्हणून नव्याने नियुक्ती देण्यात आली असून विशेष करुन केवळ नवनियुक्ती तलाठी यांना तलाठी कामकाजाबाबत व तलाठी यांचे 4 महिन्याचे प्रशिक्षणाला एकदाच सर्व तलाठी यांचे नामनिर्देशन होणे शक्य नसल्यामुळे तलाठी यांना पायाभूत माहिती होण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.


 जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, नव्याने तलाठी म्हणून महसूल विभागाचा भाग झालेले तलाठी यांना त्यांच्या कामकाजाविषयी पायाभूत माहिती होऊन त्यांनी ग्रामीण स्तरावरील शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने सदरील प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. तसेच सदरील प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाल्यानंतर तलाठी यांची लेखी परिक्षा घेऊन त्यांना प्रशिक्षण वर्गातील एखाद्या विषयावर सादरीकरण करुनच त्यांचा परिविक्षा कालावधी समाधानकारक झाल्याबाबत प्रमाणपत्र देण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

सदरील प्रशिक्षणात वर्गात दिनांक 13 मे 2024 रोजी मानवत तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी तलाठी पदाचे महत्व, हस्तलिखीत नमूने तर नायब तहसिलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी महसूल विभागातील तलाठी पदाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच (दि.14) रोजी तहसिलदार अमित घाटगे, नायब तहसिलदार गणेश चव्हाण, तलाठी संदिप बडगुजर, विठ्ठल बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. दि. 22 पर्यंत चालू असलेल्या या प्रशिक्षण वर्गात जिल्ह्यातील इतरही अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रशिक्षणास दि. 13 रोजी 88 तर दि. 14 रोजी 89 तलाठी हजर होते. सदरील प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी  जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांचे मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांचे नियंत्रणाखाली सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी हे प्रयत्न करत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या