🌟लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सामाजिक सेवाव्रती सन्मानित.....!


🌟व्यापक सामाजिक हितासाठी लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाची घोषणा..‌‌मान्यवरांचे मार्गदर्शन🌟


अकोला :- लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा सलग ३४ वा व व्दितीय संघटन अभियानातील ७ वा मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये नुकताच संपन्न झाला. अकोल्यातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ व शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली व  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ,सामाजिक व शेतकरी नेते शिवाजीराव देशमुख यांचे विशेष प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला होता.याप्रसंगी आरोग्य,जनजागृती आणि सामाजिक मदतीच्या क्षेत्रातील अग्रेसर सेवादूत संजय देशमुख (कंझारेकर) ज्येष्ठ सामाजिक सेवाव्रती प्रा.डॉ.संतोषजी हुशे,लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष- संजय एम.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम शांतीदुत तथागत भगवान गौतम बुद्ध,लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे बाबा यांना वंदन करून अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,रस्ते अपघात आणि आपत्तींमधील बळी तथा वाशिम येथील सरनाईक कुटुंबातील बळी व हृदयविकाराने अकाली मृत्यू झालेल्या निंबा येथील स्व.केशवराव देशमुख या सर्वांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.    


           शेतकरी नेते शिवाजीराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या वन्यप्राण्यांच्या त्रासाबाबत उपाययोजना अपेक्षित ठेऊन वृक्षलागवड आणि पर्यावरणासाठी समाज आणि शासनानेही कृतिशील राहण्याची अपेक्षा व्यक्त केल्या.तथा चळवळीमध्ये माणसांच्या डोक्याची गर्दी वाढण्याची आवश्यकताही अधोरेखित केली. तर डॉ.सुजय पाटील यांनी जीवनातील दैनंदिन वाटचालीतील अनुभवातून बदल करून,आसक्तिंचा  अतिरेक टाळत, वैचारीक समतोल साधून आध्यात्माचे विश्लेषणातून शांततामय जीवनाचा संदेश‌ आपल्या अध्यक्षिय भाषणातून दिला.यावेळी या दोन्ही अतिथींना तथा संजय देशमुख (कंझारेकर) यांना ग्रामगीता,सन्मानपत्र , शाल व पुष्पगुच्छाने सन्मानित करण्यात आले.लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून पत्रकार कल्याण,व सामाजिक आणि पत्रकार अन्यायाविरूद्ध आवाज उठविणाऱ्या संघटनेच्या संघर्षक वाटचालीची माहिती दिली.त्याचप्रमाणे सामाजिक नेते आणि पत्रकार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.म्हणून जास्तीत जास्त सामाजिक सेवादूतांचाही सहभागी वाढविण्यासाठी संघटनेच्या अंतर्गत लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवासंघ सुरू केल्याची घोषणा केली. सध्या त्यांचे विदर्भ अध्यक्ष म्हणून संजय कृष्णराव देशमुख कंझारेकर यांची नियुक्ती जाहिर केली.

               या कार्यक्रमाला केंद्रीय उपाध्यक्ष,पत्रकार प्रदिप खाडे, डॉ.अनुपकुमार राठी,पुष्पराज गावंडे,विभागीय पदाधिकारी अरविंद देशमुख,सौ.मिनाक्षीताई देशमुख(नागपूर), डॉ .शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,सौ.राजश्री व पंजाबराव देशमुख,(खामगाव) न्यायाधिश नितीनजी अग्रवाल,अॕड.नितीनजी धूत,सुरेश तिडके,विजयराव बाहकर,प्रा‌.मोहन काळे,शामबाप्पू देशमुख,राजाभाऊ देशमुख,अनंतराव देशमुख,अनंत महल्ले.पुंजाजी जामोदे,जगन्नाथ गव्हाळे, प्रा विजय काटे, डॉ.अशोक सिरसाठ,अॕड.संकेत देशमुख,सौ. सुलभा व रामराव देशमुख तथा युवा पत्रकार कु.मोनाली वानखडे, (खामगांव) जिल्हाध्यक्ष सागर लोडम,सतिश देशमुख अथर्व देशमुख (निंबेकर) संतोष धरमकर,गणेश देशमुख (उगवा)गौरव देशमुख,कैलास टकोरे,सुरेशभाऊ पाचकवडे,दिलीप नवले, पि.एस.देशमुख,अनिल तायडे (निंबा) वसंतराव देशमुख,धारेराव देशमुख,रविन्द्र देशमुख,आकाश हरणे,गोपाल राऊत,गजानन मुऱ्हे,कृष्णा भाऊ चव्हाण,संतोष मावळे, पि.जी.आगळे, गजानन चव्हाण,उत्स्फूर्त उपस्थिती होती.कडक उन्हातील आयोजनातही स्थानिक व बाहेगावच्या पत्रकार पदाधिकारी आणि सभासदांची उपस्थिती लक्षणिय होती.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे संचलन कैलास टकोरे यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या