🌟परभणीतील पंचशील नगर व मंत्री नगरच्या वतीने संगीतमय बुद्ध पहाट व बुद्ध संदेश रॅली कार्यक्रम संपन्न....!


🌟तक्षशिला महिला मंडळ व सुपरिवर्तन युवक मंचचा उपक्रम : ग्रीन परभणी श्वास पुरस्काराने वृक्षमित्र कैलास गायकवाड यांचा गौरव🌟

परभणी : परभणी शहरातील पंचशील नगर,मंत्री नगर येथील तक्षशिला महिला मंडळ, सुपरिवर्तन युवक मंच यांच्या वतीने (दी.23) तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त पहाटे 5 ते 8 वाजता संगीतमय बुद्ध पहाट कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 वाजता बुद्ध वंदना,ध्वजारोहण,खिरदान कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमात जिल्ह्यात वृक्षारोपण व संवर्धन चळवळ सक्रियपणे राबविणारे वृक्षमित्र तथा मंडळ कृषि अधिकारी कैलास गायकवाड यांना ग्रीन परभणी श्वास पुरस्काराने गौरविन्यात आले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना कैलास गायकवाड़ म्हणाले की मागील 16 वर्षापासून ते आजतागायत लोकसहभागातुन  विविध नगर ,शाळा,महाविद्यालय, मंदिर ,मस्जिद, बुद्ध विहार आदी परिसरात 50 हजार पेक्षा जास्त रोपांची लागवड केली तर एक लाखाहुन अधिक रोपांचे वाटप केले. लावण्यात आलेल्या रोपांचा वृक्षत रूपांतर झाले असून त्याचा फायदा मनुष्य   प्राण्यांना होत आहे. शहरातील अनेक नगरे लोकसहभागातून हिरवीगार करण्याचा प्रयत्न केला. वृक्षारोपण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टीची काळजी घेतली. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत वृक्षारोपण व  संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्याचबरोबर 2568 व्या तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने 2568 बोधिवृक्ष (पिंपळ ) व इतर वृक्ष लागवड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्यानंतर प्रा.राजकुमार मनवर यांनी मनोगत व्यक्त करुण सुमधुर गीत गायन केले. याप्रसंगी वृक्ष मित्र कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बोधि वृक्ष (पिंपळ)या वृक्षाची मान्यवारांच्या हस्ते लागवड करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता बुद्ध संदेश रॅली काढण्यात आली. यावेळी प्रा.राजेश रणखांबे,प्रा. सिद्धार्थ टोंगराव, कैलास पतंगे, तातेराव वाकळे, राजेश गायकवाड,चंद्रशेखर धुळे,बालासाहेब कीर्तने, भारतराव देवरे, किरणकुमार मानवतकर, शारदाताई पवार, रेणुकाताई गाढ़े, आशाताई भगत,कौशल्याबाई तूपसमुद्रे, निर्मलाताई शेळके, आशाताई लाटे, शोभाताई कीर्तने,मंगलताई वाकळे, कांताबाई मोरे, निलूबाई खरात, लताताई मानवतकर आदींची उपस्थिती होती.

 प्रास्ताविक बारकुजी मोरे यांनी केले. सूत्रसंचालन बंडू कांबळे पंडित तूपसमुद्रे तर आभार बळीराम आरगडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठि सिद्धार्थ हनवते, बंटी मस्के, अश्विन मोरे, ज्ञानोबा खंदारे, विजय यडे,अविनाश सरवदे, रत्नदीप भालेराव, विनायक तूपसमिंद्रे, रवी कांबळे,धुमाळे आदिसह पंचशील नगर,मंत्री नगर येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या