🌟जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त एनसीसी विद्यार्थ्यांची पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती.....!

🌟एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयााच्या ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला🌟


फुलचंद भगत

वाशिम - ३१ मे जागतिक तांबाखु विरोधी दिनानिमित्य सलाम मुंबई फाउंडेशन आयोजीत पोस्टर स्पर्धेत एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयााच्या ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचा त्याग करुन निरोगी आयुष्य जगण्याबाबत जनजागृती केली. युवकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या जाळयात ओढण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत. सुगंधी तंबाखू, गुटखा, मावा, तंबाखूजन्य पेस्ट, विडी-सिगारेट यासह अप्रत्यक्ष जाहिरात पदार्थांचे आकर्षक आवरणे यामुळे उत्सुकता निर्माण होऊन युवक विद्यार्थी या पदार्थांकडे वळतात. सध्या इतर दैनंदिन वापरातील खाद्य पदार्थ, शालेय साहित्य, सोशल मीडिया याद्वारे तंबाखू व तंबाखजन्य पदार्थांच्या जाहिरातीवर या कंपन्या भर देत आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या हेतूने राष्ट्रीय पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नाकारण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी यावर्षी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व तंबाखू, गुटखा ह्याचा दुष्परिणामाची जनजागृती सोबतच विद्यार्थ्यांनी जन्मभर ह्या सर्व व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प स्पर्धेच्या माध्यमातून केला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल,शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या