🌟सेलू येथील नूतन महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा कायम....!


🌟बारावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश🌟

सेलू (दि.२१ मे २०२४) -नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलूच्या नूतन महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2023-24 बारावी बोर्ड निकालामध्ये उज्वल यशाची परंपरा राखली आहे. फेब्रु- मार्च 2024 मध्ये झालेल्या  बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एच.एस.व्ही.सी विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.

                                              विज्ञान शाखेतून  चि. शिंदे अभिषेक विक्रम यानी 600 पैकी 522 गुण मिळवून क्रमांक मिळवला,तर कु.  थळपती श्रद्धा प्रमोद हिने 600 पैकी 508 गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर चि. जोशी कपिल गणेशराव याने 600 पैकी 493 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

                                            वाणिज्य शाखेतून चि. बादाड युवराज विष्णू याने 600 पैकी 558 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला,तर चि. राऊत संदेश राम याने 600 पैकी 551 गुण मिळवून द्वितीय क्रमांक,तर चि.जावळे किरण भागवत 600 पैकी 547 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

                                                कला शाखेतून चि. अंभोरे अक्षय हरिभाऊ याने 600 पैकी 512 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. शिंदे नंदिनी ओमप्रकाश हिने 600 पैकी 503 गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. खुळे शितल परमेश्वर हिने 600 पैकी 500 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

                      एच.एस.व्ही.सी विभागातून कु. जयस्वाल सचिता शिवनारायण हिने 600 पैकी 431 मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. बरसाले वैष्णवी नारायण हिने 600 पैकी 427 गुण मिळवून द्वितीय, तर चि. नीलवर्ण अभिषेक अरुणराव याने 600 पैकी 408 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

                विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल नू. वि. शि. संस्थेचे अध्यक्ष, डॉ. एस.एम.लोया, सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, सहसचिव श्री. जयप्रकाशजी बिहाणी, श्री. पावडे नाना, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, पर्यवेक्षक प्रा. प्रवीण सोनवणे, समन्वयक प्रा. दयानंद जामगे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या