🌟परभणीत आज दि.०५ मे रोजी जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘विनोद रंग’ व्यंगचित्र प्रदर्शन....!


🌟यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते मधुकरराव कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार🌟

परभणी (दि.०४ मे २०२४) : परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून आज रविवार दि.०५ मे २०२४ रोजी विनोद गोंगे यांच्या ‘विनोद रंग’ व्यंगचित्राचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ०९.३० वाजता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ.आसाराम लोमटे यांच्या हस्ते होणार आहे.  याप्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे सचिव किशन इदगे, परभणी जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते मधुकरराव कदम आणि संघशक्ती महिला प्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे.

              सदरील व्यंगचित्र प्रदर्शन दि.०५ व दि.०६ मे २०२४ असे दोन दिवस सकाळी १०.०० ते रात्री ०७.०० पर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य व व्यंगचित्र चाहत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या