🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟राहुल गांधींची उमेदवारी अखेर जाहीर,अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार🌟 

✍️ मोहन चौकेकर

* उद्धव ठाकरे हे राहुल गांधी अन् शरद पवारांना शरण जातील, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत, रत्नागिरीतून अमित शाहांचा हल्लाबोल ; संजयकाका यावेळी निवडणूक लढा, पुढच्यावेळी महिलेचा नंबर लागू शकतो, सांगलीच्या जागेवरून अमित शाहाचा इशारा 

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द पाळला नाही, 50 दिवसात महागाई कमी करणार होते, 10 वर्षांत जमलं नाही; शरद पवारांची जोरदार टीका ; सोयाबीन, गहू, तांदूळ, कापूस... पुरंदरच्या सभेत शरद पवारांनी शेतातलं सगळंच काढलं; नरेंद्र मोदींच्या 10 वर्षातलं दरपत्रकच मांडलं 

* काळ आला होता पण...वेळ नाही जंयत पाटील हेलिकॉप्टर अपघातातुन बालबाल बचावले ; जयंत पाटील सुरक्षित पोहोचले अन् तेच हेलिकॉप्टर महाडमध्ये सुषमा अंधारेंच्या डोळ्यादेखत कोसळले 

* जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका; आई अन् नणंदेवरील टीकेवरून, सुप्रिया सुळे संतापल्या ; विधानसभेलादेखील बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत; अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांविरोधात उभे राहणार असल्याची चर्चा

* नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विजय करंजकरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ; तुम्हाला कुठं थांबायचं अन् कुठं जायचं हे स्पष्ट करा, ठाकरे गटाने बंडखोर विजय करंजकरांना सुनावले खडेबोल! 

* खायचं कसं हे अजितदादांना चांगल माहीत, म्हणूनच त्यांना अर्थखातं दिलं, तर तुरुंगापेक्षा मुख्यमंत्रीपद बरं म्हणत एकनाथ शिंदेंनी भाजपची ऑफर स्वीकारली, ओमराजे निंबाळकरांची जोरदार टोलेबाजी ; पवनराजे हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाकडे द्या, दोन महिन्यात निकाल लावा; ओमराजे निंबाळकरांची मागणी 

* राहुल गांधींची  उमेदवारी अखेर जाहीर, अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार 

 * शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार, 3 गंभीर ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन निघालेली बस घाटात पलटली, भीषण अपघातानंतर स्थानिकांची धाव, 8 जखमी 

* उन्हाचा पारा वाढला, देश तापला! पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा ; मे महिन्यात उकाडा वाढणार! राज्यात उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता 

* जातीसाठी माती खाऊन नका, मला दिल्लीला पाठवुन सन्मानित करा पंकजा मुंडे यांचे जनतेला आवाहन 

* पाठलाग, मारहाण अन् विषप्रयोग; फटका गँगच्या मागे गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यूचा रक्तरंजित थरार 

* शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात ; दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या  

* अमोल कोल्हे भाजपात प्रवेश करणार होते -- प्रविण दरेकर 

* अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टने राजकीय वादाची ठिणगी; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्वीटर वॉर 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या