🌟शिवाजीराव साखरे मानवतेचा स्पर्श लाभलेल सात्विक व्यक्तिमत्व....!


🌟धनगर टाकळी गावाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी कार्य केले🌟

✍🏻लेखकश्रीकांत हिवाळे सर


पुर्णा तालुक्यातील धनगरटाकळीचे माजी सरपंच शिवाजीराव कोंडीबा साखरे यांचं दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळच्या प्रहरी दुःखद निधन झाले.त्यांना अवघे 47 वर्षाचे मिळाले. अस म्हटल्या जात माणूस किती दिवस जगला या पेक्षा तो कोणत्या विचारावर कोणत्या तत्व वर जगला या बाबीला अनन्य साधारण महत्व आहे.प्रसिद्ध संत वचना प्रमाणे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी या नुसार  वडील कोंडीबा साखरे कमालीचे नितिमान सदाचारी परोपकारी स्वभावाचे तर आई सुमनबाई प्रेम माया आपुलकी जिव्हाळा त्याग सेवा समर्पण अंगी असलेल्या या बाबीचा सकरात्मक परिणाम शिवाजी राव यांच्या जजघडणीत झाला. धनगर टाकळी गावाला फार मोठी समृद्ध संत परंपरा लाभली आहे. संत श्रेष्ठ दाजी गुरु महारा ज यांची ही जन्मभूमी ज्यांनी मानवतेची सहिष्णूतेची शिकवण दिली क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले  सामाजिकसमतेचे पुरस्कृते राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श  लोककल्याणकारी राज्य कर्त्या पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या समता वादी मानवता वादी कार्याचा विचार आपल्या जीवनात आचरणात आणून आयुष्य भर व्रतस्थ जीवन व्यतीत करणारे  देहादाना चा संकल्प करून तशा प्रकारचे मूर्त पत्र तयार करून सुप्रसिद्ध प्रबोधनकार सप्त खांजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनचा कार्यक्रम यशवंत ग्राम कावल गाव  येथे आयोजित करून या कार्यक्रमात हजारो जण साग राच्या उपस्तितीमध्ये देहादानाचा संकल्प करणारे सत्य शोधक मारोतराव पिसाळ यांच्या ही विचाराचा कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. तद्वतच अखिल भारतीय भिक्कू संघांचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो संत श्रेष्ठ दाजीगुरू संस्थान चे विश्वस्थ उमेश महाराज टाकळीकर यांच्या ही अध्यात्मिक कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता.राजकारणाला समाजकारणाची आदर्श जोड देऊन ज्यांनी गावाचा सर्वांगीण विकास केला.राज्य स्तरीय सरपंच सेवा संघाचा आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना बहाल झाला.
या मुळे धनगर टाकळीचे नाव राज्य स्तरावर गेले
गावाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी कार्य केले.
गावा मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षा रोपण लोक सहभागातून केले.
जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावून विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून तालूक्या मधून आ वल्ल स्थानी शाळा आणली.
ग्रामपंचायत च्या माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक घरो घरी केली.
सिमेंट कोंकरीट चे प्रशस्त  रस्ते सांडपाणी योग्य प्रकारे विल्हेवाट स्वछ नाल्या  नियमित देखभाल
स्मशान भूमी पर्यंत प्रशस्त रस्ता.त्या ठिकाणी वृक्षा रोपण  बसण्याची व्यवस्था आदी सुविधा त्यांचा कार्य काळात पूर्ण करून स्मशान भूमिला नंदनवन च स्वरूप प्राप्त करून दिले.
सर्व धर्म समभाव सामाजिक ऐक्य आपसी भाईचारा गावा मध्ये त्यांनी प्रस्तापित केला.
धनगर टाकळी येथील भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शु शोभिकारण त्यांनी स्वखर्चाने केले.
गावातील मंदिराचा जीर्णोद्धार शुशोभीकरन करण्या मध्ये ते अग्रभागी असाचे.गावा मध्ये व पंच क्रोशी मध्ये एक दानशूर परोपकारी म्हणून त्यांची ख्याती होती. "जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखवा देव तेथेच जाणावा."सर्व समाज घटकतील अडचणीत सापडलेल्या गरीब गरजु बांधवाना मदत करण्या साठी ते पुढे असायचे.
"जोडोनुया धन उत्तम व्यवहारे "
या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगतील प्रसिद्ध वचना नुसार त्यांनी आधुनिक शेती केली शेती व्यवसायाला उद्योगाची जोड दिली.
गावा मध्ये दूध डेयरी आणली. विटभट्टी उद्योग टाकला. "एक मेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ"
या प्रमाणे आपल्या सोबत संपूर्ण गावकरी यांचंहीं कल्याण साधण्या चा त्यांचा प्रयत्न होता.
वडील कोंडीबा साखरे यांच्या अकाली निधना नंतर संपूर्ण कुटुंबियांची जवाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली.
एक आदर्श जवाबदार कर्तव्य निःस्ट कुटुंब प्रमुख संस्कारक्षम सुपुत्र म्हणून त्यांनी संपूर्ण कुटुंबाला सर्वांगीण प्रगतीकडे घेऊन गेले.
सर्व भाऊ  बहीण यांच्या वर त्यांचं नि्रितिशय प्रेम होत.
त्यांच्या जीवन वेलीवर दोन सुंदर फुले उमलेली आहेत.
जेस्ट चिरंजीव अजित हा अतिशय कुशग्र बुद्धी मत्ता असलेला त्याने 12 वी सायन्स परीक्षा दिली.
त्याला डॉक्टर व्हायचं वडिलांना त्यानं तस वचन दिलंय.किडनी स्पेशाली स्ट  डॉक्टर होऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वैद्यकीय सेवा करून वडिलांचा निरपेक्ष समाज सेवेचा वारसा पुढे नेण्याचा.
त्यांची लाडकी कन्या दहावी त शिकते आहे.
तीही अभ्यासात हुशार आहे.
शिवाजीराव साखरे यांना त्यांच्या सहचारिणी यांनी जीवनाच्या प्रत्येक चढ उतारावर समर्थ साथ दिली.त्या मुळेच त्यांच्याकडून एवढे मोठे जनकल्याणचे कार्य होऊ शकले.
शिवाजीराव यांनी दिनांक 25 एप्रिल 2024 या जगाचा निरोप घेतला. अतिशय शोकाकुल वातावरणात पवित्र गोदावरी काठी त्यांच्या वर अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी संपूर्ण परभनी जिल्ह्यातून सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय पत्रकारिता अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्तित होते.
शिवाजीराव माझे विदयार्थी दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कुल येथे घेतले.आमचं गुरु शिष्याच नात आगळ वेगळं होत. माझ्या प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांची सोबत असायची.
माझी आईच ज्या वेळी दुखद निधन झाले. त्या वेळी ते अगदी सकाळी तीन वाजता 250 किलोमीटर चा प्रवास करून माझे सांत्वन करण्या साठी माझ्या गावी आले होते.कितीतरी त्यांच्या आठवणी अंतःकरण त आहेत.आठवणीची मालिका थांबता थांबत नाही. डोळ्या मधून अश्रू च्या धारा वाहू लागतात.
त्यांच्या वर श्रद्धांजली पर लिहायला सुरवात करतो.
परंतु दुःख इतकं अनावर होतहोत . लिहीन थांबवावं लागत होत.
परंतु हृदयावर एक मोठा दगड ठेऊन श्रद्धांजली पर लिहिण्याचा हा केलेला प्रयत्न...,!


भावपुर्ण श्रद्धांजली...विनम्र अभिवादन.......🙏

 
श्रीकांत हिवाळे सर


मा. तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ता. पूर्णा जि परभणी
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या