🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.....!


🌟रोजगार मेळावा जिजाऊ आय.टी.आय सांस्कृतिक सभागृह पाथरी रोड येथे आयोजीत केला आहे🌟

परभणी (दि.29 मे 2024) : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिजाऊ आय.टी.आय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 जून रोजी सकाळी 10 वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा जिजाऊ आय.टी.आय सांस्कृतिक सभागृह, पाथरी रोड, परभणी येथे आयोजीत केला आहे.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास विविध नामांकित 30 कंपन्या, तसेच स्वयंरोजगार, कर्जाबाबतची माहिती देण्यासाठी सर्व महामंडळ, उद्योजक सहभाग नोंदविणार आहेत.रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांनी नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या (mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर करावी. नाव नोंदणीची सुविधा महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे.

रोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नावनोंदणी करण्यासाठी दि. 1 जून रोजी सकाळी 9 वाजता आपल्या शैक्षणिक किंवा अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दूरध्वनी क्र. 02452-220074 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या