🌟‘हम दो हमारे बारह’ या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटावर बंदी घालण्याची हजरत टिपू सुलतान युवा मंचची मागणी....!


🌟
समाजसेवक सय्यद कादर,अ‍ॅड.आसिफ पटेल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन🌟

परभणी (दि.२८ मे २०२४) : आगामी बॉलिवूड चित्रपट ‘हम दो हमारे बारह’ या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी येथील हजरत टिपू सुलतान युवा मंच व विविध सामाजिक संघटनांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

           समाजसेवक सय्यद कादर, अ‍ॅड. आसिफ पटेल यांच्यासह महिलांच्या एका शिष्टमंडळाने आज मंगळवार दि.28) जिल्हा प्रशासनास आपल्या मागणी संदर्भात निवेदन सादर केले. त्याद्वारे, आगामी ‘हम दो हमारे बारह’ हा चित्रपट धार्मिक भावना दुखावणारा असल्यामुळे सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घालून तो देशभरात प्रदर्शित होण्यापासून रोखावा, अशी मागणी केली. दरम्यान, या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती अ‍ॅड. साहिद एस. शेख यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या