🌟परभणी येथील कृषी विद्यापीठातील स्ट्राँग रुमला जनार्दन विधाते यांची भेट....!


🌟यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमच्या सुरक्षा व्यवस्थेवर तैनात जवानांची आणि पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांशी चर्चा केली🌟

परभणी (दि.०७ में २०२४) : परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झालेले मतदान यंत्र सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँग रूमला उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांनी आज मंगळवार दि.०७ मे २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता भेट देवून पाहणी केली.

           यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांनी स्ट्राँग रुमच्या सुरक्षा व्यवस्थेवर तैनात करण्यात असलेल्या जवानांची आणि पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांशी चर्चा केली आढावा घेतला यावेळी त्यांच्यासमवेत अव्वल कारकून दत्त गिणगीने,सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या