🌟कुटुंब नियोजन साठी दिवाळीची वाट का बघता ? मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात होणार वर्षभर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया...!


🌟ग्रामीण रुग्णालयातील सर्व सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.जाधव यांनी केले🌟


फुलचंद भगत

वाशिम :- आपल्या कडे बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की शासकीय रुग्णालयात दिवाळी नंतर च कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू होतात जे की पूर्णपणे चुकीचे आहे.यातच ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे डॉ घूनागे ह्या नियमित स्त्री रोग तज्ञ असल्यामुळे या रुग्णालयात आता वर्ष भर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू असतात.त्यामुळे सामान्य प्रसूती झालेल्या सर्व माता भगिनींनी कुटुंब नियोजन साठी दिवाळी ची वाट न पाहता ग्रामीण रुग्णालयात भेट द्यावी.या सोबतच सर्व सामान्य प्रसूती तसेच गुंतागुंतीचे प्रसूती आणि १२ आठवड्या पर्यंतचे गर्भपात तसेच पाळणा लांबविण्यासाठी इतर ही साहित्य उपलब्ध आहे व हया सर्व सुविधा ग्रामीण रुग्णालयात  उपलब्ध आहेत व या सर्व सुविधा अगदी मोफत आहेत. यामुळे मंगरूळपीर शहर व ग्रामीण भागातील सर्व माता भगिनींनी ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे असलेल्या सर्व सुविधांचा अगदी मोफत उपयोग करून घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जाधव यांनी केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या