🌟परभणी महानगर पालिका प्रशासनाकडून ३३ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई....!


🌟नागरिकांनी आपल्या इमारतीवर अनाधिकृतरीत्या लावलेले होर्डींग स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे🌟 

परभणी (दि.१८ मे २०२४) : परभणी श महानगर पालिका प्रशासनाने आज शनिवार दि.१८ मे रोजी शहरात अनाधिकृतपणे लावलेल्या ३३ होर्डिंगवर कारवाई केली.

           परभणी महानगर पालिकाद्वारे शहरात रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई सुरू करण्यात आली आहे तसेच इमारतींवरती लावण्यात आलेले होर्डिंग देखील काढणे करिता संबंधितांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार काही मालमत्ता धारकांनी आपल्या इमारतीवरील होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली. प्रभाग समिती 'अ' अंतर्गत २,प्रभाग समिती 'ब' अंतर्गत ७, प्रभाग समिती 'क' अंतर्गत ८ नागरीकांनी स्वतःहुन अनाधिकृत असणार्‍या होर्डिंग काढल्या तर रस्त्यालगतच्या धोकादायक वाटणार्‍या अनाधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली. प्रभाग समिती 'अ' अंतर्गत ८,प्रभाग समिती 'ब' अंतर्गत ४ तर प्रभाग समिती 'क' अंतर्गत ४ होर्डिंग काढण्यात आले. ही कारवाई तीनही प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक, सर्व स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली.

            दरम्यान, नागरिकांनी आपल्या इमारतीवर अनाधिकृतरीत्या लावलेले होर्डींग स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या