🌟महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत सुयोग इंग्लिश स्कूलचे यश....!


🌟सुयोग इंग्लिश स्कूलची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी रिया राजेश भराडे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत केले यश संपादन🌟

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृती परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. यामध्ये दर्गा रोड,शांतीनगर परभणी येथील सुयोग इंग्लिश स्कूलची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी रिया राजेश भराडे हिने यश संपादन केले आहे. ही विद्यार्थिनी शिष्यवृतीसाठी पात्र झाली आहे. 

 या विद्यार्थिनीस श्री.रत्नदीप वेडे,प्रताप संदलापूरकर,प्रा.सिद्धार्थ गवई, प्रा.कविता सातपुते, शुभम पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल  तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे श्री.समर्थ खटकेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव प्रा.डॉ. ज्ञानोबा मुंढे, सौ. पुष्पा मुंढे, मुख्याध्यापक श्री.सिद्धार्थ गवई यांनी तिचे अभिनंदन केले.

या विद्यार्थिनीचे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने कौतुक करून अभिनंदन करण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या