🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी.....!


🌟याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. भीमराव मानकरे यांची उपस्थिती होती🌟

पुर्णा (प्रतिनिधी) -  पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समतेचे महानायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती कार्यक्रर्माचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार होते याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. भीमराव मानकरे यांची उपस्थिती होती.

महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ .रामेश्वर पवार यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले .तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. प्रभाकर कीर्तनकार यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या