🌟भरदिवसा पिग्मी एजन्टची पैश्याची बॅग व टॅब जबरीने चोरणारे चोरटे गजाआड....!


🌟हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कार्यवाही🌟

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात होणारे माला विरुध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हें शाखेचे पोलिस निरिक्षक विकास पाटील यांना वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शन वरुन त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास लावण्याचा धडाकाच लावला आहे.

हिंगोली जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी यशस्वी गुन्हे तपासाच्या यादीत आणखी एका यशस्वी तपासाची भर टाकली असून हिंगोली शहरात दि.१० मे २०२४ रोजी भरदिवसा  शहरातील औंढा नागनाथ रोडवरील ईदगाह मैदान जवळील मस्जीद समोर बंधन बैंक येथील एक पिग्मी एजन्ट (कॅशीयर) याचे बॅगमधील टॅबसह नगदी ०१,१२,२५०/- रूपयांची जबरी चोरी झाल्या संदर्भाने पोलिस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्यासंदर्भाने स्थागुशाचे स.पो.नि. शिवसांब घेवारे यांना सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने स्थागुशा पथक तपास करीत होते या गुन्ह्याचा तपास लावण्यात स्थागुशाला यश आले असून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आल्याचे समजते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या