🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, आमदार बच्चू कडू यांचा महायुतीला घरचा आहेर🌟

✍️ मोहन चौकेकर

* पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात बालहक्क मंडळाचा निर्णय धक्कादायक, आदेशाविरोधात वरील कोर्टात दाद मागणार, उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा, पुणे पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक

* पुणे अपघात प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल, राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे पोलिसांना सूचना

* रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालला संभाजीनगरहुन पुण्यात आणलं, उद्या कोर्टात हजर करणार, विशाल अगरवाल अल्पवयीन आरोपीचे वडील

* पुण्यात कोझी पबवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई,रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात छापा, पब सील

* शिंदे गटाचे नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची खंत उघड, शिंदे गटात गेल्याने कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य

* अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, तर कार्यकर्ते मनापासून झटले, उन्नीस-बीस होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया

* लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, आमदार बच्चू कडू यांचा महायुतीला घरचा आहेर

* जळगाव जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, तापमानाचा पारा ४६.३ अंशांवर, उन्हामुळे जळगावकर हैराण

* मराठवाड्यात जलसाठ्याने तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड

* घाटकोपरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी फ्लेमिंगो पक्षांचे मृतदेह, कालही आढळले होते ३९ मृत फ्लेमिंगो, फ्लेमिंगोंच्या मृत्यूचं गौडबंगाल 

* राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगरमधील तनिषा बोरमणीकरला १०० टक्के गुण

* मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश                                                     

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या