🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत - संजय राऊत

✍️ मोहन चौकेकर

* इंग्रजांना घालवले नरेंद्र मोदी काय चीज ? असे  म्हणत शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही सल्ला दिला ; देवेंद्र फडणवीस

* लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीच सत्तेवर येणार -- अरविंद केजरीवाल; भाजप महाराष्ट्रसह अनेक राज्यांत पिछाडीवर, भाजपाच्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांत जागा कमी होणार असून भाजपला फक्त 225 ते 230 जागा मिळणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य ; पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा  सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासह बडे नेते जेलमध्ये जाणार - अरविंद केजरीवाल

* संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये व मनसेमध्ये बाचाबाची, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसेला डिवचले तसेच अंबादास दानवे यांची संदिपान सुमारे यांच्यावर  टीका

* दोन पैसे हाती आले की मस्ती येते अजित पवारांचा सोनावणेंना दम तर स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, आमची मापं काढू नका; बजरंग सोनवणेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

* महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत नवनीत राणांची जहरी टीका

* राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत - संजय राऊत

* नरेंद्र मोदी 2025 मध्ये 75 वर्षीचे झाल्यावर राजीनामा देणार व त्यानंतर अमित शहा पंतप्रधान होणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाकीत

* सोशल मीडियावर मतदानासंदर्भात चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणं महागात पडणार, थेट कारवाई करण्याचा इशारा

* टिप्परने धडक दिली, छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल रस्त्यावर पडले; आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा पोलिसांनी जप्त केले 7 कोटी रुपये

* शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांचीही भर पावसात सभा; चाकणमधील सभेत जोरदार पावसाची हजेरी

* ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित ; ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

* 50 दिवसांनी जेलमधून येताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुटून पडले; अरविंद केजरीवाल म्हणाले 140 कोटी जनतेकडं भीक मागतो, देश वाचवा

* 4 जूनला याच हातांनी गोपीनाथ ममुंडेसाहेबांचे अंत्यसंस्कार केले, 4 जूनलाच निकाल येणार; पंकजा मुंडेची जनतेला भावनिक साद

* राज्यातील विविध भागात पुढील आठवडाभर म्हणजे 18 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार; हवामान खात्याची माहिती

* भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर;या वर्षी पाऊस सर्व साधारण राहणार तसेच पिके देखील सर्वसाधारण असल्याचे केले भाकित

* काँग्रेस इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास अयोध्येत शंकराचार्यांच्या हस्ते पुन्हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करणार - नाना पटोले

* पंकजा मुंडेना बिडमधुन निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईल पंकजा मुंडेना सातारा मधुन निवडुंग आणिल उदयनराजे भोसले, पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतमस्तक

* राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही ; अजित पवारांचं चॅलेंज रोहित पवारांनी स्वीकारलं

* प्रियांका गांधी यांची नंदुरबारमध्ये अतिशय विराट सभा; प्रियांका गांधी यांच्या नंदुरबार मधील सभेला नागरिकांची तुफान गर्दी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा! प्रियंका गांधी यांचे धुळ्यात आवाहन

 * नगरच्या मातीत आर. आर. आबांच्या लेकाचं तुफान भाषण

* 2025 मध्ये अमित शाह पंतप्रधान होणार व योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार; अरविंद केजरीवाल

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या