🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस जवळील कळगावलगत छोटा हत्ती व मोटारसायकलचा समोरासमोर भिषण अपघात....!


🌟अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू🌟

पुर्णा (दि.१६ मे २०२४) : पुर्णा तालुक्यातील ताडकळस जवळील कळगाव पाटीलगत एक छोटा हत्ती व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झालेल्या भिषण अपघातात एका व्यक्तीचा डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे.

                पालम येथील दोन युवक मोटारसायकलवरुन निघाले होते. ताडकळस जवळील कळगाव पाटील शिवारात या मोटारसायकलची व छोटाहत्ती या वाहनाची समोरासमोर धडक झाली. त्यात मोटारसायकलस्वार रस्त्यावर कोसळून  डोक्यास मार लागल्याने जागीच मृत्यू पावला तर अन्य एक व्यक्ती जखमी झाली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या