🌟बारावीच्या परीक्षेत संभाजीनगरची तनिषा बोरामणीकरने राज्यात अव्वल येऊन प्रथम क्रमांक पटकावला......!


🌟तनिषा बोरामणीकरने मिळवले 600 पैकी 600 मार्क🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

छत्रपती संभाजीनगर :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग अव्वल ठरला आहे.  छत्रपती संभाजीनगरमधील तनीषा बोरामणीकर तरूणीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने कॉमर्समध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. तनीषाच्या या यशानंतर आता सर्वस्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तनीषा बोरमणीकर ही छत्रपती संभाजी नगरमधील देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तिने बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण 582 गुण मिळवले होते. आणि स्पोर्टस अ‍ॅक्टीव्हिटीत भाग घेतल्यामुळे तिला अतिरिक्त 18 गुण देण्यात आले होते. त्यामुळे तनीषाने 600 पैकी 600 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.तनीषा बोरामणीकर केवळ अभ्यासातच नाही तर खेळातही अव्वल आहे. ती एक उत्तम बुद्धिबळपटू आहे आणि तिने 8 वर्षांखालील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही तिने अनेकदा भाग घेतला आहे तनीषा बोरामणीकर तिच्या या यशाचे श्रेय तिचे पालक आणि देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिले आहे. त्याचसोबत तिचे आई वडील तिच्या या यशावर म्हणतात की, तनीषा बोरामणीकर लहानपणापासून सर्व गोष्टींसाठी स्वातंत्र्य दिले होते, त्यामुळेच आज तिने हे मोठे यश मिळवले आहे. 

दरम्यान तनीषा बोरामणीकर हिची आई सीए असून वडील आर्किटेक्ट आहेत. तनीषाला तिच्या आईप्रमाणेच सीए क्षेत्रात करिअर करायचं आहे.यासोबत भारतीय नागरी सेवांमध्ये सामील होण्याचे देखील तिचे स्वप्न आहे. परंतु सध्या ती तिच्या सीए अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करत आहे. तनीषा बोरामणीकर खेळाबरोबरच अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करून यश संपादन केले आहे. आव्हाने स्वीकारण्याची आणि बुद्धिबळाच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची सवय असल्यामुळे परीक्षा आणि अभ्यासाचा ताण नसल्याचे तनीषा बोरामणीकर हिने सांगितले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या