🌟परभणी शहरातील अनाधिकृत होर्डिंग तात्काळ हटवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी....!


🌟संभाजी ब्रिगेडची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟

परभणी (दि.15 मे 2024) : परभणी शहरातील बिल्डिंग,रोडवर असलेले अनाधिकृत होर्डिंग तात्काळ हटविण्यात याव्यात व सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवार दि.14 मे 2024 रोजी परभणी शहर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

           परभणी शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मोठमोठ्या बिल्डिंगवर, उड्डाण पुलावर अनाधिकृतपणे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.  लवकरात लवकर या सर्व बिल्डिंगवरील सर्व होर्डिंग्ज काढून टाकण्यात याव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर या संदर्भात तीव्र निषेध आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांंनी  महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते, नितीन जाधव, रमेश देशमुख गोविंद इककर, राजकुमार टाक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या