🌟वाशिम जिल्ह्यातील एलपीजी गॅस ग्राहकांनी ई-केवायसी व बेसीक सेफ्टी चेकला सहकार्य करावे.....!


🌟नागपुर येथील इंडियन ऑईलचे वरिष्ठ अधिकारी बिजॉय पाटी यांचे आवाहन🌟

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वत्र एलपीजी गॅस ग्राहकांच्या घरोघरी गॅस एजन्सीचे कर्मचारी जाऊन निशुल्क गॅस तपासणी व गॅसची सुरंक्षीतते बाबत माहिती देणे तसेच ई-केवायसी सर्व देशभर सुरु असुन गॅस  रबर ट्युब बदलने आवश्यक असल्यास 100  रुपया मध्ये  गॅस रबर ट्युब एक्सचेंज सुरु असुन ग्राहकांनी सहकार्य करावे जेणेकरुन आपले गॅस कनेक्शन व सबसिडी  भविष्यात बंद होणार नाही असे प्रतिपादन इंडियन ऑईलचे वरिष्ठ अधिकारी नागपुर येथिल श्री बिजॉय पाटी यांनी विठ्ठल मंदिर संस्थान मंगरुळपीर येथे आयोजित सेप्टी  क्लिनीक या कार्यक्रामात उपस्थित ग्राहकांना केले. गॅस सुरक्षतते बद्दलची संपुर्ण माहिती विक्री अधिकारी सन्मान सहारे यांनी दिली. याप्रसंगी मंचकावर ग्राहक पंचायतचे प्रा.सुधिर घोडचर,उमेश नावंदर,संजय महाराज (मानोरा) , जय गुप्ता, दयारामजी चव्हाण,सौ.राधाताई केदार, सौ लता चितालंगे, सौ.सरिता पुरोहित ,सौ. चंचल खिराडे,  उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तमजी चितलांगे यांनी केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या