🌟पाथर्डी तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सचा रोलर पुजन कार्यक्रम संपन्न.....!


🌟यावेळी कारखान्याचे संचालक राहुल आर देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

प्रतिनिधी

पाथरी :- पाथर्डी तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सच्या २०२४-२५ गळीत हंगामाचा रोलर पुजनाचा कार्यक्रम मंगळवार १४ मे रोजी माजलगावचे माजी आ तथा कारखान्याचे चेअरमन आर टी देशमुख जीजा यांच्या हस्ते विधिवत पुजनाने सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या वेळी मोहन जोशी बाभळगावकर गुरूजी यांनी पौरोहित्य केले. तत्पुर्वी ग्रामदैवत हनुमंतरायाचे पुजन करून शेतकी विभागाच्या तोडणी,वाहतुक यंत्रनेचा शुभारंभ करण्यात आला. या नंतर मिल रोलर पुजन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी कारखान्याचे संचालक राहुल आर देशमुख,डॉ.अभिजीत आर देशमुख, प्रमोटर लक्ष्मीकांत घोडे, सुदामराव सपाटे  जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर साखरे, चीफ केमिस्ट नवनाथ चौधरी, ऑफिस मॅनेजर राजकुमार तौर, केन मॅनेजर पी.जी. गायकवाड, चिफ अकौंटंट मुकेश रोडगे, सुरक्षा अधिकारी वाघमारे, प्रगतशील शेतकरी किरण घुंबरे, पिंटू घुबरे, ऊसतोड वाहतूक ठेकेदार नारायण राठोड ,मंकाजी शिंदे ,प्रल्हाद चव्हाण, गजानन सपाटे आदींची उपस्थिती होती......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या