🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला छतावरून ढकलून जिवे मारण्याचा प्रयत्न....!


🌟आरोपी शेख इम्राण शेख कबीर विरोधात गुन्हा दाखल🌟

परभणी (दि.१३ मे २०२४) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस घराच्या छतावरुन खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी शेख इम्राण शेख कबीर राहणार राज मोहल्ला गंगाखेड याच्या विरोधात गंगाखेड पोलिसांनी जीवे मारण्यासह विनयभंग व पोक्सो काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

           या संदर्भात सविस्तर वृत्त असे की आज मंगळवार दि.१३ मे रोजी सकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास नमूद घटनेतील आरोपी शेख इम्राण शेख कबीर या नराधमाने पिडीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड काढली पिडीत मुलीने स्वतःच्या बचावासाठी आरडा ओरड केली तेव्हा नातेवाईकांनी छतावर धाव घेतली. त्यावेळी संबंधित आरोपीने मुलीस छतावरुन खाली ढकलून दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी शेख इम्राण यास अटक केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या