🌟मंगरुळपीर नगरपरिषदेच्या कमानिला 'संत गाडगेबाबा प्रवेशव्दार' असे नाव द्यावे.....!


🌟सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची प्रशासनाकडे मागणी🌟


मंगरुळपीर :- मंगरुळपीर नगरपरिषदेने बांधलेल्या कमानिला 'संत गाडगेबाबा प्रवेशव्दार' असे नाव द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.


         नगरपरिषद कार्यालयाने बांधलेल्या सुंदर कमानिमुळे कार्यालयाच्या सौदर्यात भर पड़ली आहे. आपले मंगरूळपीर शहर हे स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी येथील नगरपरिषद सदैव कटिबध्द असते.जीवनभर ज्या राष्ट्रसंताने स्वच्छतेचा मुलमंत्र दिला तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी जनतेला सर्वधर्म समभाव शिकविला. विज्ञानवादी विचारांची रुजवणूक केली.गावाच्या विकासासाठी सर्वधर्मीयांनी चांगल्या विचाराने प्रेरीत होवुन एकञ यावे व सर्वांनी काम करावे असा मोलाचा संदेशही दिला आहे.मंगरुळपीर शहराला केंद्राचा स्वच्छतेच्या बाबतीत ओडीएफ प्लस दर्जाही प्राप्त झालेला आहे.एवढेच नव्हे तर मंगरुळपीर नगरपरिषदेला संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार मिळुन विभागातुन प्रथम क्रमांकही मिळाला आहे.असे महान राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार सदैव जनमानसात रूजावे व सदैव लोकांना प्रेरणा मिळावी या करिता नगरपरिषदेच्या कमानिला 'संत गाडगेबाबा प्रवेशव्दार' असे नाव देवून मौलीक विचारांची रुजवणुक करावी या मागणीचे लेखी निवेदन दि.22 मे रोजी जिल्हाधिकारी,ऊपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी न.प.मंगरुळपीर,ठाणेदार तसेच तहसिलदार यांना दिले आहे.....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या