🌟जगतज्योती महात्मा बसवेश्‍वरांंचा संदेश जगाला शिकवण देणारा - डॉ.केदार खटींग


🌟महात्मा बसवेश्‍वर जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते म्हणाले🌟 

परभणी (दि.१० मे २०२४) : जगतज्योती महात्मा बसवेश्‍वर यांचा मानवतेचा संदेश हा जगाला शिकवण देणारा आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ.केदार खटींग यांनी केले.

          महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवार दि.१० मे रोजी वसमत रस्त्यावरील कारेगावकर संकुलातील आबा ट्रेडर्स येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते महात्मा बसवेश्‍वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आबा कारेगावकर, प्रा.सुनील मोडक, नगरसेवक सचिन देशमुख, पत्रकार सूरज कदम, प्रभू दीपके, दिनेश चांडक, विष्णू मेहत्रे, रणजित कारेगांवकर, बाबा सोनवणे, आशिष सोनवणे, समरजित कारेगावकर आदी उपस्थित होते.

       पुढे बोलतांना खटींग यांनी १२ व्या शतकात जगाला समता, एकता आणि मानवतेचा संदेश देत कर्मकांड, जातिभेद, अंधश्रद्धा व लिंगभेदावर प्रहार करणारे आणि कामातच ईश्‍वर शोधून स्वकष्टाने जगा, निसर्गावर प्रेम करा, अशी शिकवण महात्मा बसवेश्‍वर यांनी जगाला दिली असे म्हटले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या