🌟पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील सनराइज् विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती शिंदे हीचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश...!


🌟संस्कृती शिंदे हीने पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवले यश🌟 

पूर्णा (दि.०७ मे २०२४) - पुर्णा तालुक्यातील मुंबर येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील कु.संस्कृती बालाजी शिंदे ही सनराइज् विद्यालय धानोरा काळे येथील वर्ग पाचवी मधील विद्यार्थिनीने पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविली आहे.विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित शिक्षक वृंदा कडून सत्कार करण्यात आला आहे यावेळी उपस्थित शाळेतील  शिक्षक वृंद काळे सर, शेख सर, पौळ सर, बनसोडे मॅडम,पालक बालाजी शिंदे,गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यंकटराव पौळ,निवृत्ती महाराज  शिंदे, तुकारामजी शिंदे विठ्ठलराव शिंदे, राम पितळे, सतिश शिंदे,श्याम शिंदे, दत्ता शिंदे, नामदेव शिंदे,माधव कस्तुरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या