🌟शहीद जवान अंकुश वाहूळकरांचे तिरंण्यात लपेटून आलेले पार्थिव पाहून आईन फोडला हंबरडा.....!


🌟वीर मरण आलेल्या जवान अंकुश यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार🌟


शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली : आईची माया ही.जगावेगळी असते. अंगाखांद्यावर वाढविलेले लेकरू हे तिला सतत आपल्या डोळ्यासमोर बागडत येत असलेले दिसत असते. पण आज पहाटे लाडका मुलगा जवान अंकुश वाहुळकर यांचा पार्थिवदेह तिरंगा झेंड्यामध्ये पाहून आईने हंबरडा फोडला. सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना २२ मे रोजी झालेल्या अपघातात वीर मरण आलेल्या जवान अंकुश यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाहुळकर कुटुंब, नातेवाईक, गुंज ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील गावाकरी शोकाकूल झाले होते.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील सैन्य दलातील जवान सिक्कीममध्ये शहीद झाले असून कर्तव्यावर जातांना वाहनाला अपघात झाला होता  अंकुश एकनाथ वाहूळकर (२४) असे जवानाचे नांव  आहे. वसमत तालुक्यातील गुंज येथील जवान अंकुश हे सन २०२१ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. परभणी येथे भरती झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. मागील पंधरा दिवसांपुर्वीच ते सुट्टी संपवून परत कर्तव्यावर रूजू झाले. 

आज पहाटे ५ वाजता जवान अंकुश वाहुळकर यांचे पार्थिवदेह गुंज गावात आणण्यात आले. आणला होता. तिरंगा झेंडामध्ये लपेटलेला मृतदेह खाली उतरताना आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला. सकाळी ९ वाजता गावातून वाहुळकर यांचे घर ते शेतापर्यंत अंत्ययात्रा निघाली. यावेळी पोलिस व जवान हे रथाच्या बाजुने चालत होते. वीर जवान अंकुशचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून ग्रामस्थ सकाळीच हजर झाले होते. 'वीर.जवान अंकुश अमर रहे'च्या घोषणा देत सर्वजण अंत्ययात्रेत सहभागी झाले. वाहुळकर यांच्या शेतात पार्थिव देह आल्यानंतर विशेष पोलिस पथकाने बिगूल.वाजवून सलामी दिली व आकाशात बंदूकीच्या तीन.फैरी झाडल्या. त्यानंतर वडिल एकनाथ वाहुळकर व भाऊ शिवानंद वाहुळकर यांनी वीरजवान अंकुश.वाहुळकर यांच्या चितेला भडाग्नी दिला.

गुंजचे सुपुत्र जिल्ह्याची शान अंकुश वाहुळकर यांना सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना वीर मरण आले. गावात त्यांच्या वीर मरणाची बातमी धडकली अन् काही मिनिटासाठी अख्खे गाव स्तंब्ध झाले. एका आईने एका वडीलाने आपला मुलाला भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर जाण्याचे बळ दिले होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील त्यांची कमी कधीच भरून निघणार नाही हि दुखत बातमी गावात कळताच पूर्ण गावावर शोककळा पसरली

दरम्यान, गुंज व आसेगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या जवान अंकुश यांनी सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला होता. परभणी येथे सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली होती..पंधरा दिवसांपुर्वी ते सुट्टी संपवून परत गेले होते. मात्र.विवाहासाठी मुलगी पाहण्यासाठी जाण्याचा आग्रह.त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. मात्र कर्तव्याला प्राध्यान देत ते त्यांच्या कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,तहसीलदार शारदा दळवी, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान, कर्नल विशाल रायजादा, क्यपटन राहुल सिंग,.संतोष कुमार, राजेश गाडेकर, मुकाडे, माजी सैनिक बाबूराव जांबुतकर, भालेराव हे अखेरचे अंत्यदर्शनासाठी हजर होते. वसमत तालुक्यातील गुंज या छोट्या गावातील लेकराची सैनिक म्हणून भरती व्हावी आणि ऐन तारुण्यात वीर मरण यावे, असा निष्ठुर.खेळ नियतीने का केला? असा प्रश्न अंत्यदर्शनाच्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या