🌟वच्छलाबाई सखाराम गायकवाड व सौ.गंगासागर भुसारे महिला उन्नती संस्थेतर्फे मातृ दिनी सन्मानित....!


🌟त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟 


परभणी - जागतिक मातृदिन ( मदर्स डे) महिला उन्नती संस्थे तर्फे परभणीत दि.12 मार्च 2024 रोजी,  ' जेष्ठ आदर्श माता ' वच्छलाबाई सखाराम गायकवाड व सौ.गंगासागर धाराजी भुसारे यांना आदर्श गृहलक्ष्मी माता पुरस्काराने सन्मानित करून साजरा करण्यात आला.


परभणी येथील रविराज पार्क मधील वास्तव्यास असलेल्या 81 वर्ष वयाच्या , आपल्या नावाप्रमाणेच प्रेमळ स्वभावाच्या श्रीमती वच्छलाबाई सखाराम गायकवाड यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत मुलांना शिकवुन त्यांचे जीवन सुखी बनविले आहे.परभणी शहर महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक पदी कार्यरत असलेले ,नालंदा विपश्यना केंद्राचे अध्यक्ष करण गायकवाड यांच्या त्या मातोश्री आहेत,अशा कर्तृत्ववान मुलांची माता असलेल्या श्रीमती वच्छलाबाई सखारामजी गायकवाड यांचा महिला उन्नती संस्थेचे मराठवाडा संभाग अध्यक्ष तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष , जेष्ठ पत्रकार, मदन (बापु ) कोल्हे यांचे हस्ते 'आदर्श गृहलक्ष्मी माता 'सन्मानपत्र, पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर अत्यंत निट नेटकेपणाने घर सांभाळून आपल्या मुलांचे संगोपन करीत,त्यांचेवर चांगले संस्कार घडवुन यशस्वी जीवनाची वाटचाल पादाक्रांत करत, सामाजिक बांधिलकी पत्करून समाजकार्याबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या संपादिका सौ.गंगासागर धाराजी भुसारे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महिला उन्नती संस्थेतर्फे ' आदर्श गृहलक्ष्मी माता ' पुरस्काराने सन्मानित करून गौरविले आहे.

 प्रारंभी महिला उन्नती संस्थेच्या सौ.मनीषा शशिकांत एंगडे यांनी वच्‍छलाबाई गायकवाड यांचा पुष्पहाराने सत्कार करून सन्मान केला.श्रीमती वच्छलाबाई गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या तीन मुले व चार मुलींचे संगोपन केले,काबाडकष्ट करून शिक्षण दिले. त्यांनी 32 वर्षे परभणी नगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागात स्वच्छता कामगार म्हणून नोकरी करून मुलांना घडविले त्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले ,या सर्व कार्याची दखल घेऊन महिला उन्नती संस्था तर्फे मातृदिनी वच्छलाबाई गायकवाड यांचा सन्मान करून गौरव करण्यात आला आहे . सामाजिक बांधिलकी पत्करून,समाजाच्या विविध क्षेत्रांमधील घटकांसोबत सलोख्याचे संबंध ठेवुन , सामाजिक, धार्मिक व पत्रकारांच्या हितासाठी संघटीतपणे  सदैव कार्यरत असलेले, धाराजी भुसारे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यावेळी सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.

या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा ' इरा 'चे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष दी.फ. लोंढे , मराठा महासंघाचे व समन्वय समिती चे जेष्ठ नेते, सामाजिक चळवळी मधील अग्रणी, जिवन स्फुर्ती परिवाराचे संस्थापक ,जेष्ठ पत्रकार धाराजी भुसारे,महिला उन्नती संस्थेचे मीडिया चीफ,  माजी विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे,  ' इरा ' चे मराठवाडा विभाग अध्यक्ष राजकुमार एंगडे  दै.लोकपत्र चे प्रतिनिधी विजय चट्टे, ' इरा ' चे सदस्य प्रदीप कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.श्रीमती वच्छलाबाई सखारामजी गायकवाड व सौ गंगासागर  धाराजी भुसारे यांचा मातृदिनी गौरव झाल्याबद्दल, महिला उन्नती संस्था व इरा परिवारातर्फे  अभिनंदन करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या