🌟सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश....!


🌟परभणी जिल्ह्यातील निवासी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.15 टक्कें🌟 

परभणी (दि.30 मे 2024) : न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त जिल्ह्यातील अनुसूचित जाती मुला-मुलीच्या चार शासकीय निवासी शाळा कार्यरत असून, नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

परभणी जिल्ह्यातील निवासी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.15 असून अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, मानवत या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून, या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शाळेतील कु. वैशाली ज्ञानोबा बनसोडे व अश्विनी आप्पाराव सोनकांबळे या दोन्ही विद्यार्थिनीने 84.40 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येणाचा मान मिळविला आहे. तर कु. प्रतीक्षा वचिष्ठ लांगडे या विद्यार्थिनीने 79 टक्के गुण मिळविले आहेत. कु. सुहाना पांडुरंग शेजावळे व गायत्री कचरू कन्हाळे या दोन्ही विद्यार्थिनीने 76.20 टक्के गुण घेऊन शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. पूर्णा येथील अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचा निकाल 96.15 टक्के लागला आहे. सावंत शेखर भिवाजी या विद्यार्थ्यांने 78.20,  अवचार सुरज संजयने 74.20 तसेच दुधमक सिद्धांत अविनाश या विद्यार्थ्याने 71.80 टक्के घेऊन अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. हदगाव पावडे येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचा निकाल 94.11 टक्के लागला असून या शाळेतील लोखंडे धम्मपाल राजु या विद्यार्थ्याने 65.20 टक्के, काकडे नितेश रमेश 64.2०, तुपसामिंद्रे प्रशांत प्रकाश ६३.४० टक्के गुण मिळविले आहेत. जिंतूर तालुक्यातील अकोली येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचा निकाल 84.61 टक्के लागला असून या शाळेतील जाधव प्रशांत अच्युत 68.80 टक्के,  घोंगडे सिद्दोधन अशोक 66.40 टक्के आणि गायकवाड गजानन मधुकर या विद्यार्थ्याने 63 टक्के टक्के घेतले आहेत.

सामाजिक न्याय विभागांतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया,  प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे आणि सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या