🌟परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता....!


🌟जालना,परभणी व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता🌟 

परभणी (दि.०९ मे २०२४) : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज गुरुवार दि.०९ मे रोजी मराठवाड्यातील परभणी,नांदेड,हिंगोली,जालना,छत्रपती संभाजी नगर,बीड,धाराशिव,लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,विजांचा कडकडाट,वार्‍याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच जालना,परभणी व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या