🌟वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व वाव गो ग्रीन हरियाणा यांच्याद्वारे पेडगावात संत्रा बागेवर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक...!


🌟 परभणी तालुक्यातील पेडगाव येथील श्री विजय जंगले यांच्या संत्रा बागेत अडीच एकरवर फवारणी करून देण्यात आली🌟

परभणी/पेडगाव :- शेतीच्या विविध कामांमध्ये फवारणी अत्यंत महत्त्वाचे काम असून त्याकरिता पारंपारिक पद्धतीचा वापर केल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेवर मजूर मिळत नाही, पिकास रोग लागल्यावर वेळच्या आत फवारणी होत नाही, मुजरावर व औषधीवर अवाढव्य खर्च करूनही पिकाच्या परिस्थितीनुसार बऱ्याच वेळेस सापाची भीती, फळबाग व इतर पिकांची उंची इत्यादी कारणास्तव प्रभावीपणे वेळेवर फवारणी करणे शक्य होत नाही त्यामुळे खर्च करूनही शेतीचे गणित बिघडतात व उत्पादनात घट येते.

 शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता राष्ट्रीय पातळीवर ड्रोन करीता सल्ला देणारे मा. कुलगुरू डॉ. इंद्रमणी वनामकृवि, परभणी यांनी शेतकऱ्यांकरिता डॉ. शंकर गोयंका यांची गो ग्रीन कृषी विमान, हरियाणा या कंपनीशी शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ड्रोन द्वारे फवारणी करता यावी याकरिता सामंजस्य करार केला. त्या अनुषंगाने आज पेडगाव येथील श्री विजय जंगले यांच्या संत्रा बागेत अडीच एकर वर फवारणी करून देण्यात आली. या प्रात्यक्षिका करिता परिसरातील 50 शेतकऱ्यांनी हजेरी दर्शवली विद्यापीठाच्या वतीने डॉ. स्मिता सोलंकी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी श्री अनिल हरकळ, तसेच वाव गो ग्रीन कंपनीचे श्री कोल्हे, श्री राहुल मगदूम व ड्रोन पायलट आर्यवीर ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ड्रोन प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे शंका समाधान केले. शेतकऱ्यांसमोर अडीच एकर वरील संत्रा बागेत फवारणी झाल्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व विद्यापीठांनी शेतकऱ्यांकरिता तंत्रज्ञान त्यांच्या बांधावर आणून अवगत केल्याने विद्यापीठाचे आभार मानले व उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसे व होणारे काबाडकष्ट हे कमी होऊन तरुण शेतकऱ्यांना नक्कीच या नवीन तंत्रज्ञानाद्वारे रोजगार उपलब्ध होईल अशी भावना व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या