🌟दलित चळवळीतला पॅथर नेता हरपला ; माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे निधन....!


🌟आज रविवार दि.05 मे रोजी सायंकाळी 04.00 वाजता अंत्यसंस्कार🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकर चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री मा. श्री. गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचे काल सकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे.


त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी 4  वाजता त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरातच होणार आहे. तरी आंबेडकरी जनतेने व त्यांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व समाजबांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पॅथर  रिपब्लिकन पक्षाच्या तसेच त्यांच्या आप्तस्वकीय व मित्र परिवाराने केले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या