🌟मराठवाडय़ातून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी......!


🌟मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दमरेच्या व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी🌟

परभणी (दि.04 मे 2024) - उन्हाळा मध्यावर आला तरीही दक्षिण-मध्य रेल्वे ने मराठवाडय़ातील प्रवासी जनतेला अद्याप उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची सोय दिली नाहीत. पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर गोवा इत्यादी शहरांना जोडणाऱ्या गाड्या सुरू करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. या बाबत प्रवासी महासंघाने दमरेच्या व्यवस्थापक नीती सरकार यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. या बाबत दिलेला निवेदनात म्हटले आहे की दमरे ने  मागील दोन महिन्यापासून नवीन गाड्यांची लॉलीपॉप दाखवण्यात येत असून मे महिन्याची सुरुवाती नंतर देखील उन्हाळी विशेष गाड्यांची पत्ताच नाहीत. दक्षिण-मध्य रेल्वेकडून आंध्रा-तेलांगण विभागात दररोज अनेक नवीन गाड्यांची सोय उपलब्ध करताना त्यातून नांदेड विभागाला सोयिस्कर रीतीने दुर्लक्ष करून मराठवाडय़ातील प्रवाशांवर अन्याय केला आहे  मराठवाडय़ातील रेल्वे राज्य मंत्री असताना त्यांचा आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या जालना-छप्रा आणि जालना-तिरूपती या दोन्ही रेल्वे गाड्यांना बंद करून रेल्वे राज्यमंत्र्यांचे अवमान देखील करण्यात आली आहेत.

आठ दिवसा पूर्वी सुट्टीत नियोजन असलेली नांदेड-पनवेल रेल्वेचे 40 फेऱ्यांची विशेष रेल्वेची घोषित केली होती मात्र दोनच फेरी नंतर प्रवासी नसलेल्या कारण पुढे करण्यात आली. पहिल्याच फेरीत सदर रेल्वेला नांदेड येथून रात्री ११ ची रेल्वेला सकाळी ६ ला म्हणजे तब्बल सात तास उशीराने सोडल्यावर कोण प्रवासी सदर रेल्वेत प्रवास करणार ?  "हम करे सो कायदा" प्रमाणे दमरे विभागातील अधिकार्यानी एसी कार्यालयात बसून त्याना हवा असलेल्या गाड्यांना बळजबरीने थोपटून त्याच वेळेस प्रवाश्यांना काडीमात्र उपयोग नसलेले गाड्यांना मात्र बळजबरीने चालवण्यात येतात, एका पाठोपाठ एकदम तीन-चार रेल्वे चालवणे नंतर चार ते पाच तासापर्यंत एक ही रेल्वे उपलब्ध नसणे, सर्व जनप्रिय जलद गाड्यांचे २५ किमी प्रमाणे कंटाळवाणे गतीने निर्धारित करून प्रवाशांना रेल्वे प्रवासातून हाकलून देण्याची षडयंत्र पद्धतशीर पणे चालवण्यात येत आहेत. ह्या सर्व कारणाने मराठवाडय़ात रेल्वे प्रवासी संख्या कमी असलेले निगेटिव्ह रिपोर्ट कार्ड रेल्वे बोर्डा समोर दाखवून भविष्यात मराठवाडय़ात नवीन गाड्यांची सोय न मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस मराठवाडा विरोधी अधिकाऱ्यांची एक लाॅबी कार्यरत आहेत.  मराठवाडय़ातील प्रवाश्यांना  तात्काळ नवीन उन्हाळी स्पेशल  गाड्यांना अविलंब सुरू करण्याची मागणी मराठवाडा प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, शंतनू डोईफोडे, हर्षद शहा, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, खदीर लाला हाश्मी, अमित कासलीवाल, रुस्तुम कदम इत्यादींनी केली आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या