🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात खरीप पिक परिसंवादामध्ये स्वाती घोडके यांचा सन्मान...!


🌟कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान🌟 

 परभणी (दि.२० मे २०२४) - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी यांनी दिनांक १८ मे २०२४ रोजी खरीप पिक परिसंवादाचे आयोजन केले होते यावेळी डॉ.इंद्रा मणी कुलगुरू,सुनील चव्हाण सचिव मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन, डॉ.शरद गडाख डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, रावसाहेब भागडे महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे, विवेक दामले अध्यक्ष सविधा कृषी क. प्रा.लि. मुंबई, रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी, डॉ. उदय खोडके संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी, डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, डॉ.देवराव देवसरकर संचालक बीज उत्पादन, दशरथ तांभाळे संचालक आत्मा, कृषी आयुक्तालय पुणे, साहेबराव दिवेकर विभागीय कृषी सहसंचालक लातूर, डॉ.तुकाराम मोटे विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर, डॉ. हरिहर कौसडीकर संचालक संशोधन पुणे, डॉ. शंकर गोयंका, डॉ.धर्मराज गोखले संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रशांत देशमुख मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी वनमक्रवी परभणी, अनिल गवळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी, दौलत चव्हाण प्रकल्प संचालक आत्मा परभणी, तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे या सर्वांच्या हस्ते, स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, यांना कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं,तसेच विस्तार कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शेतकऱ्यांना वेळोवेळी अगदी उत्स्फूर्तपणे योग्य मार्गदर्शन केल्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी मदतकरणे, प्रगतशील शेतकरी हे खूप काबाडकष्ट करतात त्यांच्या कष्टाची दखल म्हणून स्वाती घोडके या नेहमीच या प्रगतशील शेतकऱ्यांच्या अगदी खंबीरपणे पाठीशी उभे राहून,शेतकऱ्यांचे प्रस्ताव पुरस्कारासाठी अगदी उल्लेखनीय असे प्रस्ताव तयार करतात,असेच या शेतकऱ्यांच्या काबाडकष्टाला कुठेतरी यश मिळवून देण्याचा प्रयत्न करतात,शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर शेती करतात, प्रक्रिया उद्योग आहेत,पण शेतकऱ्यांना प्रक्रिया केलेले आपले पदार्थ कसे विकायचे हे माहीत नसल्यामुळे याबाबतही शेतकऱ्यांना वेळोवेळी त्या मदत करतात, तसेच कृषी विभागातील अभ्यास दौरे,शेती शाळा,प्रशिक्षण हे जास्तीत जास्त त्या महिलांसाठी उपलब्ध करून देतात,याचा महिला शेतकरी वर्गाला खूप फायदा होतो,कारण शेतात काम करणाऱ्या या 80 टक्के महिलाच असतात या सर्व कामांची दखल घेऊन अजून शेतकरी वर्गांसाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि चांगलं काम केलं तर शाब्बासकीची थाप कुठेतरी मिळावी यादृष्टीने डॉ. इंद्र मणी कुलगुरू  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, यांनी स्वाती घोडके यांना शाबासकीची थाप देत  हा सन्मान दिला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या