🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यातील जांब येथे विज अंगावर पडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू तर एक जन जखमी...!


🌟विजेच्या कडकडाटासह पडलेल्या अवकाळी पावसाने केला कहर🌟 

फुलचंद भगत

मंगरुळपीर :- हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर आणि मालेगाव तालुक्यात सुसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडला.दरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील जांब प्लॉट येथे मुली अंगणात खेळत असताना अंगावर विज कोसळून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरी मुलगी जखमी झाली.जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, घराबाहेर खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली.दुर्गा दिनेश कांबळे (वय १४ वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून रविना धम्मपाल सुर्वे असे जखमी मुलीचे नाव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या