🌟‘स्वाधार’ पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन.....!


🌟असे आवाहन समाज कल्याणाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे🌟

परभणी (दि.07 मे २०२४) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहण्यास पात्र आहेत. मात्र प्रवेश न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोतर शिक्षण घेता यावे, यासाठी स्वाधार योजनेतून अशा पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून मदत देण्यात येते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती तात्काळ सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.   

स्वाधार योजनेंतर्गंत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांनी स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट आवश्यक रक्कम वितरीत करण्याची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत सुविधा आहे. त्यानुषंगाने सन 2023-24 या वर्षासाठी 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक होती. सध्यस्थितीत स्वाधार योजनेंतर्गत सन 2023-24 वर्षासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा खात्यातील रक्कम संबंधित लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी लाभार्थ्याचे नाव, संपूर्ण पत्ता, पिन कोड, मोबाईल, पॅन क्रमांक, इमेल आयडी, बँकेचे नाव व बँकेची शाखा, बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड तसेच कॅन्सल चेक आदि वैयक्तिक माहिती (इंग्रजी Format मध्ये) तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याकरिता सन 2023-24 अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाकडे ही माहिती तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे....  

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या