🌟काझीपेठ एक्स्प्रेसने प्रवास करतांना रेल्वेत विसरलेले महिला प्रवास्याचे ०७ लाखा रुपयांचे दागिने केले परत....!


🌟श्रीक्षेत्र शेगाव रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रंजन तेलंग यांच्या कर्तृत्वाला सलाम🌟


 
शेगाव :- आपल्या दमदार व प्रामाणिक कामगिरी ने नेहमी चर्चेत असलेले श्रीक्षेत्र शेगाव रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रंजन तेलंग यांनी आज शुक्रवार दि.१७ मे २०२४ रोजी भुसावळ येथील मेडिकल ऑफिसर डॉ.संदीप जैन यांच्या सौभाग्यवती काझीपेठ एक्सप्रेसने प्रवास करून भुसावळला उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचे संपूर्ण दागिन्यांची पर्स ही ट्रेन मधेच राहिली या घटने संदर्भात त्यांनी तात्काळ भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक दिपक तायडे यांना सांगितले असता त्यांनी याची खबर शेगाव रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रंजन तेलंग यांना दिली माहिती मिळताच तेलंग यांनी ड्युटी संपूनही सात लाखाचे दागिने असल्याने स्वतःच काझीपेठ एक्सप्रेस ट्रेन येईपर्यंत थांबून ट्रेन चेक करून ०७ लाख रुपयांचे दागिने आपल्या ताब्यात घेतले व सुपूर्द नामा बनवून प्रवासी जैन कुटुंबाच्या स्वाधीन केले.आपल्यातील कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रवासी वर्गात देखील सतत चर्चेत राहणारे प्रामाणिक अधिकारी रंजन तेलंग यांच्या प्रामाणिक पणाचे या प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात देखील सर्वत्र कौतुक होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या