🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या......!


🌟दिल्लीतील तिहार तुरुंगात बॉम्बस्फोट करण्याची धमकी; याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू🌟

✍️ मोहन चौकेकर

* शरद पवारांसोबत राहून अस्तित्व नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत आले,  देवेंद्र फडणवीस ; उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत सरकार बनवण्यास इच्छुक होते  सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट 

* गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप आल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा, पण जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार, आदित्य ठाकरेंचा जोरदार निशाणा ; राहुल गांधी पंतप्रधान म्हणून कसा कारभार करतील? आदित्य ठाकरे म्हणाले, जर-तर मध्ये मला जायचं नाही, पण 4 जूननंतर कोण पंतप्रधान नाही बनलं पाहिजे, हे मात्र ठरवलंय

* आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही, संजय राऊत; नरेंद्र  मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल, संजय राऊतांचं वक्तव्य 

* घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 43 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु ; घाटकोपर भीषण होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू ;अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेली जागा रेल्वे पोलिसांचीच असल्याची  माहिती 

* कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला, भरत राठोडचा मृत्यू ; मुलांच्या उमलत्या वयात अनेक कुटुंबाचा आधार गेला, घाटकोपर दुर्घटनेतील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर 

* मुंबईतील होर्डिंग अपघातामुळे पुणे महापालिका अलर्ट मोडवर ; अनधिकृत होर्डिंग्सवर थेट कारवाई करण्याचे आदेश 

* पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत रोड शो ; वाहतुकीत बदल, काही मार्ग बंद, पार्किंग व्यवस्थेतही बदल

* अवकाळी पावसाचं थैमान! केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा पिकांचं नुकसान; 12 जनावरांचा मृत्यू 

* शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय 

* पीएफ खातेधारकांचं टेन्शन मिटलं, पीएफ खातेधारकांनी पीएफसाठी केलेला क्लेम आता अवघ्या तीन दिवसांत निकाली निघणार 

* महाराष्ट्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोडवर आणले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शो वरून उद्धव ठाकरेची टीका 

* पंतप्रधान मोदींना आठ टक्के मुस्लिमांचं मतदान, राज्यघटना बदलणार नाहीत, रामदास आठवलेंना विश्वास

* कांद्याचे दर घसरले, मार्केट यार्डात आवक कमी, नासक्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना फटका

* घाटकोपर दुर्घटनेत 60 जखमी, 14 मृत्यू; जखमींना अडीच लाखापर्यंत आर्थिक मदतीची घोषणा

* भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

* छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश; तब्बल 30 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

* रोहित पवारांचा गंभीर आरोप, “महाराष्ट्रात निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी दोन हजार कोटींचं वाटप केलं”

* श्री तुळजाभवानी देवीचा दरबार भक्तांच्या गर्दीने फुलला; कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांची गर्दी वाढली

* दिल्लीतील तिहार तुरुंगात बॉम्बस्फोट करण्याची धमकी; याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या