🌟परभणीत भगवान परशूराम जन्मोत्सवा निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न.....!


🌟शोभायात्रेतील सजीव देखाव्यांनी वेधले परभणीकरांचे लक्ष : शोभायात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग🌟

परभणी (दि.१० मे २०२४) : आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि.१० मे २०२४ रोजी सायंकाळी भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेची परभणीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.


        छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील पेढा हनुमान मंदिरापासून या शोभायात्रेस सायंकाळी ०६.३० वाजता प्रारंभ झाला. तत्पूर्वी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान श्री परशूराम यांच्या प्रतिमेची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, डॉ. केदार खटींग, प्रथम महापौर प्रतापभैय्या देशमुख, डॉ. विवेक नावंदर, बंडू नाना सराफ, सचिन देशमुख, राजेश देशपांडे, मोहन कुलकर्णी, स्वप्नील पिंगळकर, कमलकिशोर अग्रवाल, अनिल डहाळे, अरविंद काका देशमुख, नवनीत पाचपोर, प्रशास ठाकूर, दिलीप शर्मा, योगेश जोशी-सोनपेठकर, स्वप्नील पिंगळकर, नंदकुमार परांडकर, सचिन दैठणकर, विजय शर्मा, पवन शर्मा, शंकर आजेगावकर, पिंटू देशमुख, विठु गुरु वझूरकर, संजय कुलकर्णी, सुरेंद्र नेब, संदीप साळापूरीकर, अभिजित सराफ, किशोर देशपांडे, डॉ. श्रीराम मसलेकर, डॉ. संजय टाकळकर, डॉ. राहुल अंबेगावकर, डॉ. सुधांशू देशमुख, डॉ. विकास धर्माधिकारी, दिपक कासंडे, नितीन शुक्ल, नित्रुडकर गुरुजी, प्रकाश बारबिंड, संजय पांडे, राज बंगाळे, सराफ काका, योगेश गौतम, दिनेश नरवाडकर, उमेश कुलकर्णी, दीपक पांडे, प्रणव उमरीकर, मकरंद कुलकर्णी, विष्णू खळीकर, मंदार कुलकर्णी  यांच्यासह परशुराम जयंती जन्मोत्सव समितीचे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  

           या शोभायात्रेमध्ये भगवान परशुराम यांचा सजीव देखावा, पारंपारिक वाद्य, बॅन्ड पथक, रथावर आरुढ भगवान परशुरामाची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगवे फेटेदारी पुरुष, महिला यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रतिमा पूजनानंतर ही मिरवणूक निघाली. ही मिरवणूक शहरातील विसावा कॉर्नर, नारायण चाळ, गांधी पार्क, राजाराम सभागृह पर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी आरतीनंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. विविध प्रकारच्या वाद्यांसह पारंपारिक वेषभूषेमध्ये नागरिक, महिला, युवक, युवती सहभागी झाले होते. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी परशुराम जन्मोत्सव समितीच्या शोभायात्रेमध्ये दाखल झाले होते.

दरम्यान, परशुराम जन्मोत्सव समितीसह विविध संघटनांनी शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी परशुराम जयंती साजरी केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या