🌟परभणी लोकसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟लोकसभा निवडणूकीचा अधिकृत निकाल दि.०४ जुन रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अपेक्षित🌟


परभणी (दि.२७ मे २०२४) : परभणी लोकसभा निवडणूकीची मतमोजणी येत्या दि.०४ जून २०२४ रोजी होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगासह प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सोमवारी दि.२७ मे रोजी पत्रकार परिषदेतून दिली.


         वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवार दि.०४ जून २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे असे जिल्हाधिकारी गावडे यांनी नमूद केले. मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात पोस्टल मतांची प्राधान्याने मोजणी होणार असून त्यासाठी १४ स्वतंत्र टेबल असणार आहेत. त्या पाठोपाठ ईव्हीएम मतमोजणीस प्रारंभ होणार असून विधानसभा निहाय टेबलवर एकूण मतदान ओळखून तेवढ्या फेर्‍यांद्वारे मतमोजणी होणार आहे.

           जिंतूर विधानसभा मतदारसंघातील ४२४ मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी १४ ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत एकूण ३१ मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहे. परभणी मतदारसंघातील ३३३ मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी १४ ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत. एकूण २४ मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहे. गंगाखेड मतदारसंघातील ४३२ मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी१४ ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत. एकूण ३१ मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहे. पाथरी मतदारसंघातील ३९८ मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी १४ ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत. एकूण २९ मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहे. परतूर मतदारसंघातील ३५० मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी १४ ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत. एकूण २५ मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहे. तर घनसावंगी मतदारसंघातील ३५३ मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी १४ ईव्हीएम मतमोजणी टेबल असणार आहेत. एकूण २६ मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहे. अशा एकूण २ हजार २९० मतदान केंद्रावरील मतांची मोजणी होणार आहे, असे जिल्हाधिकारी गावडे यांनी नमूद केले.

* परभणी लोकसभा मतदारसंघात ६२.२६ टक्के मतदान :-

         जिंतूर विधानसभा मतदारसंघात ०१ लाख २५ हजार २८७ पुरुष,०१ लाख ७ हजार ५६३ महिला तर तृतियपंथी ४ असे एकूण २ लाख ३२ हजार ८५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे ६४.७८, महिलांचे ५९.९१ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ६२.४३ टक्के एवढी आहे परभणी विधानसभा मतदारसंघात १ लाख १२ हजार ६७९ पुरुष,९७ हजार ३४८ महिला असे एकूण ०२ लाख १० हजार २७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे ६५.१५, महिलांचे ५९.९३ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ६२.६२ टक्के एवढी आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात १ लाख ३९ हजार ७६० पुरुष तर १ लाख १७ हजार ८५६ महिला असे एकूण २ लाख ५७ हजार ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे ६५.६४ तर महिलांचे ६०.१४ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ६३ टक्के एवढी आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात १ लाख ३२ हजार ८९० पुरुष तर १ लाख १० हजार ७१२ महिला असे एकूण २ लाख ४३ हजार ६०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे ६७.४३, महिलांचे ६०.८६ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ६४.२७ टक्के एवढी आहे. परतूर विधानसभा मतदारसंघात १ लाख १ हजार ३१६ पुरुष,८४ हजार २६४ महिला असे एकूण १ लाख ८५ हजार ५८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे ६२.२३, महिलांचे ५६.७३ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ५९.६० टक्के एवढी आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात १ लाख ५ हजार ६८५ पुरुष, ८६ हजार ५०४ महिला असे एकूण १ लाख ९२ हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांचे ६४.१७, महिलांचे ५७.४० टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ६०.९३ टक्के एवढी आहे. एकूण परभणी लोकसभा मतदारसंघात ११ लाख ३ हजार ८९१ पुरुषांपैकी ७ लाख १७ हजार ६१७ तर १० लाख १९ हजार १३२ महिलांपैकी ६ लाख ४ हजार २४७ महिला मतदारांनी असे एकूण १३ लाख २१ हजार ८६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यात ६५.०१ पुरुष व ५९.२९ टक्के महिलांनी व १२.१२ टक्के तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदारसंघात ६२.२६ टक्के मतदान झाले.......

* निवडणूक आयोगाच्या सूचना :-

             मतमोजणीसाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांसह निरीक्षकांची विधानसभा निहाय नेमनूका करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि कोणतीही ईलेक्ट्रॉनिक वस्तू असणार नाही. मतमोजणी परिसरात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी पुरविलेल्या पासेस किंवा ईसीआय कडील पासेस असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावर प्रवेश मिळणार नाही. पोस्टल बॅलेटची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात 14 टेबलवर होईल. सर्व ईव्हीएम (सीयू) ची मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी ड्रॉ पध्दतीने निवडलेल्या सहा मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट पेपर स्लिपची मतमोजणी एका टेबलवर क्रमाणे केली जाणार आहे.

            मतमोजणी कक्षात निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व सूक्ष्म निरीक्षक, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश राहणार आहे.

          सकाळी 5 वाजता सर्व कर्मचार्‍यांनी मतमोजणी केंद्रांवर दाखल व्हावे, असे सूचित करण्यात आले आहे. स्ट्राँग रुममध्ये सकाळी 7 वाजता उघडतांना उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल अथवा ईलेक्ट्रॉनिक साहित्य घेवून येवू नये, सर्व मतमोजणी प्रतिनिधींनी पासेससह हजर रहावे, विधानसभा मतदारसंघ आणि नेमून दिलेला टेबल सोडून मतमोजणी प्रतिनिधींना इतरत्र जाता येणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी गावडे यांनी दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या