🌟नांदेड येथील हुजुरी सिख समुदायाचा जत्था पवित्र तपस्थान श्री हेमकुंड साहीब तिर्थयात्रेसाठी रवाना....!


🌟पवित्र तिर्थक्षेत्र श्री हेमकुंड साहीबसह पंजाब राज्यातील अनेक पवित्र तिर्थक्षेत्रांचे घेणार दर्शन🌟


 
नांदेड (दि.२१ मे २०२४) :- नांदेड येथील हुजुरी सिख तिर्थयात्रेकरुंचा जत्था आज मंगळवार दि.२१ मे २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता हुजुर साहीब नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसने सिख धर्माचे दहावे गुरु दसमपिता साहीब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांचे पवित्र तपस्थान श्री हेमकुंड साहीब तिर्थयात्रेसाठी रवाना झाला.




हुजुर साहीब नांदेड येथून श्री हेमकुंड साहीब तिर्तयात्रेसाठी रवाना झालेल्या हुजुरी सिख समुदायाच्या जत्थ्यामध्ये पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब अबचल नगर गुरुद्वारा बोर्डाचे माजी सेक्रेटरी सरदार रविंद्रसिंघ बुंगई, सरदार जगदीपसिंघ नंबरदार,सरदार जगदीप सिंघ चौहान,सरदार जगजीतसिंघ खालसा,सरदार नरेंद्रसिंघ घाडीसाज, सरदार हरदीपसिंघ घाडीसाज,सरदार हरजीतसिंघ पेशकार,सरदार गुणवंतसिंघ घाडीसाज,सरदार हरदीपसिंघ घाडीसाज,सरदार सुमीतसिंघ घाडीसाज,सरदार गुरुप्रकाशसिंघ घाडीसाज,सरदार सप्रीतसिंघ पेशकार,सतनामकौर घाडीसाज,परमेश्वरकौर घडीसाज,हरप्रीतकौर पेशकर,गुरविंदरकौर पेशकर यांचा समावेश असून सदरील हुजूरी सिख तिर्थयात्रेकरुंचा जत्था नांदेड ते दिल्ली,दिल्ली ते अंबाला,अंबाला ते ऋषिकेश,ऋषिकेश ते गोविंदघाट,गोविंदघाट ते श्री हेमकुंड साहीब,श्री हेमकुंड साहीब ते बद्रीनाथ,बद्रीनाथ ते पौंटा साहेब,पौंटा साहेब ते पवित्र तख्त आनंदपूर साहीब,आनंदपूर साहीब ते अमृतसर आदी पवित्र तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन दि.०१ जुन २०२४ रोजी हुजुरी साहीब नांदेड येथे येणार आहेत...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या