🌟नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील लहान येथील कु.ऐश्वर्या लोणे बारावी परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण....!


🌟लहान येथील छत्रपती विद्यालयाची विद्यार्थ्यींनी कु.ऐश्वर्या लोणे हिने मिळवले एच.एस.सी परिक्षेत ८१ टक्के गुण🌟

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील लहान येथील छत्रपती विद्यालयाची विद्यार्थ्यींनी कु.ऐश्वर्या आनंद लोणे या शेतकऱ्याच्या मुलीने एच.एस.सी परिक्षेत ८१ टक्के गुण मिळवून विशेष प्रवीण्याने उत्तीर्ण झाली आहे.ऐश्वर्याने नियमित अभ्यास करून यश मिळविले असुन तिला डॉक्टर होऊन सामान्य जनतेची सेवा करायची असा तिचा संकल्प आहे.

ऐश्वर्याने मिळविलेल्या यशाबद्दल माजी सभापती अशोक सावंत,पत्रकार कॉग्रेसचे जिल्हा प्रवक्ते सुभाष लोणे, दत्तराव देशमुख ,सरपंच सदाशिव पाटील इंगळे, उपसरपंच शेख महेबुब,संस्थेचे अध्यक्ष विजय देवडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अनिल लोणे,अरुण लोणे,संगिता थोरात,वडील आनंद लोणे,इंजि.जिवक लोणे ग्रामपंचायत सदस्य विजय सावंत, दलित वाहेवळ,पृथ्वीराज गच्चे,दिलिप लोणे आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या