🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे स्मार्ट सुनबाई स्पर्धा संपन्न....!


🌟संस्कार गुरुदेव महिला मंडळाचे आयोजन🌟

फुलचंद भगत

वाशिम : वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यातील संस्कार गुरुदेव महिला मंडळ शेलुबाजार च्या सौजन्याने स्मार्ट सुनबाई हा दोन दिवसीय कार्यक्रम राबवण्यात आलेला होता.या कार्यक्रमामध्ये परिसरातील महिलांनी ऊत्फुर्तपणे सहभाग घेवुन आपल्या सुप्तगुणाचे सादरीकरण केले.

            प्रोत्साहन आणी योग्य व्यासपिठ मिळाले की अंगातील सुप्तगुणांना वाव मिळुन कला जगासमोर येतात.यातुन मोठमोठे व्यक्तीमत्व घडत असतात.महिलांनाही आपल्या अंगातील सुप्तगुणांना चालना मिळावी या हेतुने शेलुबाजार येथील संस्कार गुरुदेव महिला मंडळाच्या सौजन्यातुन सामाजीक कार्यकर्त्या दुर्गा दुगाणे यांच्या प्रमुख नेतृत्वात 'स्मार्ट सुनबाई' हा दोन दिवशीय कार्यक्रम राबवण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या सञातील  अध्यक्षस्थानी ह.भ.प.सौ अनुराधा देशमुख तर प्रमुख पाहुण्या सविताताई घोडे आदर्श कुटुंबातील आदर्श सुनबाई,सौ प्रमिला सिताराम पवार(सरपंच शेलुबाजार) तर कार्यक्रमाचे उद्घाटक सौ कविताताई परमेश्वर खरात(समाजसेविका वाशिम)या होत्या.कार्यक्रमाच्या दुसर्‍या सञातील 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ त्रिगुणा संतोष मुरकुटे( समाजसेविका),प्रमुख पाहुणे अपर्णाताई विजय जायभाये रिसोड(अपर्णा महिला बुद्धीशीय संस्था सेवाभावी),सौ मोहिनी हजारे आकोट (युट्युब वर) हे होते.या कार्यक्रमासाठी बक्षिसे सौ उषाताई बाहेती यांनी पैठणी साडी,त्रिगुणा मुरकुटे यांनी पोछा, मनीषा जाजू यांनी टिफिन डब्बा हे दिले.या कार्यक्रमाचे प्रथम बक्षिस वैशाली माकोडे यांनी पटकावले असुन सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा दुगाणे यांच्या हस्ते देण्यात आले.व्दितीय मनीषा लांबाडे तर तृतीय बक्षिस सोनू फुके यांना दोन पक्षी संस्कार गुरुदेव महिला मंडळ यांच्या हस्ते देण्यात आले.'स्मार्ट सुनबाई'या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गा दुगाणे,मीरा देवळे,प्रियंका इंगळे,शालिनी वानखडे,कोमल चौधरी,लता येवले,चैताली सावके,भावना बोबडे,उषा बाहेती,बेबी क्षिरसागर यांचेसह संस्कार गुरुदेव महिलामंडळांनी सहकार्य केले.या कार्यक्रमात बहुसंख्य महिलांनी सक्रीय सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ब्लड डोनर गृपनेही महत्वाची भुमिका बजावली असुन रक्तदानाचे महत्वही ऊपस्थीतांना पटवुन दिले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या